The Diocese of Marathwada (CNI)

header photo

आमच्या वेब साईट वर आपले स्वागत आहे

प्रभू उठला आहे! खचित उठला आहे!

"कारण देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला ह्यासाठी कि, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे "

योहान ३:१६

ह्या वेबसाइट चा उद्देश मराठवाडा धर्मप्रांतातील आशीर्वादित मंडळीला अधिक चांगली सेवा देण्या करिता आहे. 

 

धर्माप्रांतातील मंदिराचे सौंदर्य आणि वास्तू वारसा (Architectural Heritage) हे दोन संघातल्या कठीण परिश्रमा मुळे शक्य झाले. ते दोन संघटना म्हणजे CMS (चर्च मिशनरी सोसायटी) आणि स्कॉटिश प्रेस्बायटेरिन मिशनरी होय.

धर्मप्रचारकांनी  (Missionaries) दिलेला हा  सांस्कृतिक वारसा मराठवाडा धर्मप्रांत कायम राखते ज्या मुळे आपल्या परम पवित्र देवाचे नाव गौरविले जाते. 

इ.स. 1818 मध्ये , ब्रिटिश महाराष्ट्रात राज्य भागात आपले राज्य स्थापन केले ज्या मुळे प्रोटेस्टंट धर्मप्रचारकांना देवाचे कार्य सुरू करण्यासाठी संधी प्रदान झाली. 
ब्रिटिशांनी पाहिले कि सर्व भारतीयान पैकी मराठे सर्वात उर्मट आढळले. ह्या मुळे महाराष्ट्र भूमीवर ख्रिस्ती प्रसार सर्वात कठीण ठरला.  

इ.स. 1713 - 1818 च्या काळात पहिल्याने उच्च जाति चे ब्राह्मण सर्व महत्त्वाच्या सरकारी पदांवर होते आणि पेशवाईतील मराठा राज्यात आपले वर्चस्व राखले होते पण त्यांची शक्ती ते गमावले होते ह्या बाबीशी ते स्वत: ला जोडू शकले नाही.

हा संताप आणि तिरस्कार नंतर ख्रिस्ती धर्माप्रचाराकांवर उलटला. दुसरे म्हणजे, महाराष्ट्राचे कवी संत उदा.  संत . तुकाराम , नामदेव आणि इतर चातुर्वर्णीय (Lower Caste) लोकांनी भक्ती चळवळ माध्यमातून मराठा समाजा मध्ये आध्यात्मिक समता आणि एकतेची भावना विकसित केली होती त्यामुळे त्या समाजामध्ये आध्यात्मिक एकता प्रबळ होत गेलि. 

विशेषत: तुकारामने  त्याच्या अभंगांच्या  माध्यमातून मराठ्यांचे अंत:करण भक्ती आणि भावनांनी काबीज केली होती . एका अर्थाने, ही भक्ती पद्धत  महाराष्ट्राची आध्यात्मिक गरजा भागविण्यासाठी यशस्वी होती, आणि धर्मप्रचारकांना ह्या पद्धतीचा प्रभावावर मात करणे कठीण झाले. 

परंतु औरंगाबाद मध्ये CMS चे केंद्रे सर्वात यशस्वी ठरललॆ. वर्ष 1860 मध्ये, डेव्हिडसन यांच्या नेतृत्वाखाली आणि कॅतेखिस्त रूपाने औरंगाबाद मध्ये पहिल्यांदा प्रवेश झाला.  पहिल्या मंडळीत २४ धर्मांतर केले गेले. 

हळूहळू CMS मिशन कडे अनेक लोक वळले गेले. स्कॉटलंड चर्चने आधीच जालना येथे कार्याची स्थापना केली होती, म्हणून, CMS आणि स्कॉटलंड चर्च ह्या दोन संस्थां दरम्यान एक समज/मतैक्य करण्यात  आला ज्या मध्ये प्रत्येक मिशनचे काम क्षेत्र सिमांकित केली गेली.

१९२१ पर्यंत औरंगाबाद मध्ये किमान ४००० ख्रिस्ती होते. महार आणि मांग लोकांमध्ये या क्षेत्रात एक चळवळ सुरु झाली परंतु सल्ला देणारे आणि संगोपन करणारे पुरेशे ख्रिश्चन सेवक नसल्या मुळे  ही चळवळ धीमी पडली. 

अफाट क्षेत्र आणि मोठ्या संख्येने धर्मांतआपली रीत असल्या मुळे भारतीय पाद्रीना प्रभावी होणे कठीण गेले. S.J. दिवे  यांनी ७० गावांमध्ये आपली सेवा दिली जेथे काही ख्रिस्ती होते. S.S. पाटोळे चे कार्य हजार ख्रिस्ती असलेले ११० गावांच क्षेत्र जपणे होते.

मराठवाडा धर्मप्रांत अंतर्गत जालना स्कॉटलंड मिशनरिनी बांधलेल्या प्रथम मंदिराचे नाव कॅथेड्रल चर्च (Christ Church) होय. आणि हे चर्च अजूनही देवाच्या गौरवासाठी आपले भव्य सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा जपून आहे. मराठवाडा धर्मप्रांत ह्या वास्तूचे सांस्कृतिक वारस्याचे आदर करते आणि ह्या सोबत दी चर्च मिशनरी सोसायटी आणि दी स्कॉत्तीश प्रेस्स्बायतेरिअन मिशन या दोन संसंथानांचे मन:पुर्वक आदर करते कारण ह्यांच्या कठीण परिश्रमामुळेच मराठवाड्यात क्रिस्ती विश्ववाची बीज पेरली गेली. 

The present Bishop of the Diocese The Rt. Revd. M. U. Kasabas an overseer is committed towards the growth of Churches through mission and evangelism. He through his experience and humble nature mingles with the people and help them in nurturing their spiritual needs. 

The Diocese of Marathwada, also has some old and beautiful Churches in the city of Aurangabad like Christ Church, Holy Trinity Church, St. Philip Church, these churches are the best architectural work of the 18th century missionaries. These Churches stands firm in demonstrating the Christian values taught by the CMS missionaries.

Praise be to the Almighty Lord and God.

Bless His Holy Name now and forever more!!